टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; प्रताप सरनाईक | Aggregator Policy Maharashtra | Manoj Jarange

टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; प्रताप सरनाईक | Aggregator Policy Maharashtra | Manoj Jarange

Published : Sep 09, 2026, 09:05 PM IST

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या Aggregator Policyबाबत माहिती दिली. प्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी चालकांना बॅज घेणे आवश्यक असून, त्यासाठी राज्यात 15 वर्षे वास्तव्याचा दाखला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही चालकांकडे डुप्लिकेट परवाने आढळल्याचे तसेच परदेशातून आलेले सुमारे 30 चालक पकडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भारत टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडोसह विविध कंपन्यांनी अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांत आवश्यक कागदपत्रे RTOकडे सादर करावी लागतील. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर परवानगी दिली जाईल. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर किंवा रॅपिडो चालवण्यासाठी मराठी भाषा अनिवार्य असून अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी काही मुदत दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. प्रवाशांना नेण्यास नकार देणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांविरोधात तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत बोलताना 15 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित तीन मागण्यांसाठी सरकारने वेळ मागितल्याचे सरनाईक म्हणाले. एका समाजाचा हक्क काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची दारे खुली असून जरांगेंनी आपल्या मागण्या मांडाव्यात, मात्र नेत्यांबद्दल अपशब्द वापरल्यास आम्हीही मराठा आहोत आणि रस्त्यावर उतरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या ‘टायगर’ वक्तव्यावर सरनाईक यांनी टोला लगावला, तर उमर अब्दुल्ला यांनी ‘वंदे मातरम्’च्या सर्व ओळी म्हटल्याचे स्वागत केले.

07:15Supriya Sule | दुष्काळग्रस्तांसाठी सुप्रिया सुळेंची फूड पॅकेज मागणी
03:21Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी ट्रॅक्टर चालवून केला गाळ उपसा
05:53Nishikant Dubey | मारुती प्रकरणी सोनिया गांधींवर निशिकांत दुबेंचे आरोप
02:51Uddhav Thackeray | हुतात्मा स्मारकात उद्धव ठाकरे-अरविंद सावंतांचं अभिवादन
05:08Sanjay Raut | Maharashtra Drought Relief | २२ लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर संजय राऊतांचा प्रश्न
08:49Chandrashekhar Bawankule | पडीत जमिनींबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
03:56Devendra Fadnavis | Sunetra Pawar | हुतात्मा चौकात फडणवीस-सुनेत्रा पवारांचं अभिवादन
04:07Gulabrao Patil l मंत्री गुलाबराव यांचा तरुण आमदारांना सल्ला
05:53Jalgaon JDCC Bank : आमदार किशोर आप्पांना सांगेल मुलाला आवर घाला - आमदार मंगेश चव्हाण
05:01Jalgaon JDCC Bank : भाजप आमदाराला, शिवसेना आमदाराच्या मुलाकडून शिव्या देऊन चॅलेन्ज