मोबाइलपासून दूर राहून मिळवलं यश, राजस्थानच्या नेहाची UPSC Success Story

Published : Jul 04, 2025, 11:00 PM IST
upsc success story

सार

राजस्थानमधील नेहा ब्याडवालने तीन वर्षे मोबाईलचा वापर न करता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिची गुजरातमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली असून, तिच्या यशाचे श्रेय ती मोबाईलपासून दूर राहिल्यामुळे मिळालेल्या एकाग्रतेला देते.

मोबाईल ही आजच्या काळातील सर्वात जास्त गरजेची वस्तू बनली आहे. पण या मोबाईलवर आपला वेळ मोठ्या प्रमाणावर वाया जात असतो. अनेक लोकांना जवळ मोबाईल नसेल तर चैन भेटत नाही. एका तरुणीने तीन वर्ष मोबाईलपासून लांब राहून यश मिळवलं आहे. तिने मिळवलेलं यश आजच्या काळातील मुलांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. युपीएससी परीक्षेत त्या मुलीनं स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर यशस्वी झाली आहे.

राजस्थानमधील जयपूर येथील आणि छत्तीसगढमधील नेहा ब्याडवाल हिने अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांची नेमणूक भरूच, गुजरात येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. वयाच्या २४व्या वर्षी तिची अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांचे वडील अधिकारी असून आई आयईएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

फोन न वापरल्यामुळे अभ्यास करणं झालं सोपं 

फोन न वापरल्यामुळे नेहाची अधिकारी पदावर निवड झाली आहे. नेहा सोशल मीडियावर प्रसिद्ध असून तिचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. तिचे एक लाखाच्या आसपास फॉलोवर्स झाले आहेत. नेहाचा जन्म राजस्थान येथे झाला होता. नेहाची स्टोरी अनेकनासाठी प्रेरणादायी आहे. तिने फोन न वापरल्यामुळे अभ्यास करणे सोपे झाले होते. अनेकवेळा बोलताना याबद्दलचा उल्लेख केला होता.

अभ्यास करताना लक्ष देणं आवश्यक 

लक्ष देऊन अभ्यास करणे काळाची गरज बनत चालली आहे. आपण मोबाईल, लॅपटॉप याच्या नादी लागून अभ्यासाकडे दुर्लक्ष करत चाललो आहे. त्यामुळं आपण मोबाईल पासून लांब राहणं काळाची गरज बनत चालली आहे. त्यामुळं शक्यतो आपण नेहाकडे प्रेरणा म्हणून पाहून पुढं जात राहायला हवं, तिची प्रेरणा घेऊन अभ्यास करत राहावा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!