Air India Delhi Washington Flight Cancelled : एअर इंडियाच्या दिल्ली-वॉशिंग्टन विमानाला टेक्निकल ब्रेक!, व्हिएन्नामध्ये प्रवाशांना उतरवावं लागलं

Published : Jul 03, 2025, 09:27 PM ISTUpdated : Jul 03, 2025, 09:30 PM IST
Air India

सार

Air India Delhi Washington Flight Cancelled : एअर इंडियाच्या दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने व्हिएन्नामध्ये प्रवास थांबवावा लागला. प्रवाशांना उतरवून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या दिल्लीहून वॉशिंग्टन (अमेरिका)कडे जाणाऱ्या AI103 विमानात एक तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे विमानाचा प्रवास अर्ध्यावरच थांबवावा लागला. ही घटना 2 जुलै रोजी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे घडली. नियोजित इंधन भरण्याच्या थांब्यावरच ही अडचण उघडकीस आली आणि प्रवाशांना तातडीने विमानातून उतरवण्यात आलं.

देखभाल तपासणीदरम्यान तांत्रिक बिघाड उघड

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "AI103 ही फ्लाईट दिल्लीहून वॉशिंग्टनसाठी नियोजित होती. 2 जुलै रोजी व्हिएन्नामध्ये इंधन भरण्याकरिता नियोजित थांबा होता. या वेळी विमानाची नियमित तपासणी सुरु असताना एक महत्त्वाचा देखभाल विषय (maintenance task) समोर आला, ज्याचे निराकरण होईपर्यंत विमान पुढील प्रवासासाठी योग्य नव्हते."

वॉशिंग्टनची फ्लाइट रद्द, प्रवासी उतरवले

विमानाच्या तांत्रिक दुरुस्तीला वेळ लागणार असल्यामुळे व्हिएन्ना ते वॉशिंग्टन हा टप्पा रद्द करण्यात आला. यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं आणि त्यांना पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

परतीचा प्रवासही झाला रद्द

या तांत्रिक अडचणीचा परिणाम फक्त एका प्रवासापुरताच मर्यादित राहिला नाही. वॉशिंग्टनहून दिल्लीकडे येणारी परतीची फ्लाइट AI104 (Washington to Delhi via Vienna) देखील रद्द करण्यात आली.

प्रवाशांना पर्यायी फ्लाइट किंवा पूर्ण परतावा

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, प्रवाशांच्या पसंतीनुसार, "प्रभावित प्रवाशांना पर्यायी फ्लाइट्सवर रिबुक करण्यात आलं आहे किंवा त्यांना पूर्ण परतावा (Full refund) दिला जात आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय

तांत्रिक कारणास्तव प्रवास रद्द होणं हे प्रवाशांसाठी त्रासदायक असलं तरी, विमान कंपन्यांच्या दृष्टीने हा निर्णय प्राथमिकतेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला असतो. एअर इंडियानेही या बाबतीत तत्परता दाखवून योग्य पावलं उचलली.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!