CUET US Results 2025 Out : सीयूईटी युजीचा निकाल जाहिर, cuet.nta.nic.in संकेतस्थळावरुन डाउनलोड करा रिजल्ट

Published : Jul 04, 2025, 03:49 PM ISTUpdated : Jul 04, 2025, 05:09 PM IST
CUET UG Results

सार

CUET UG Result 2025 : नॅशनल टेस्टिंग एजंसीकडून सीयूईटी निकाल 2025 जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल डाउनलोड करता येणार आहे.

CUET UG Result 2025 : एनटीएकडून सीयूईटी यूजी निकाल 2025 जाहीर केला आहे. यामुळे दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना हा निकाल आज पाहता येणार आहे. एनटीए सीयूईटी यूजी निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल. येथे विद्यार्थ्यांना अर्जाचा क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरुन निकाल पाहता येणार आहे. याशिवाय गुणपत्रिका डाउनलोडही करता येणार आहे. थोडावेळ आधीच एनटीएकडून सीयूईटी यूची निकालाची डेमो लिंक सक्रिय केली होती.

सीयूईटी यूजी परीक्षा 13 मे ते 04 जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या निकालाची वाट पाहली जात होती. नॅशनल टेस्टिंग एजेंसीने 1 जुलै 2024 रोजी सीयूईटी यूजी Final Answer Key 2025 जारी केली होती. यानंतर 02 जुलैला आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली होती. एनटीएन दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, सीयूईटी यूजीचा निकाल 04 जुलैला लावला जाईल. पण वेळ त्यावेळी सांगितली नव्हती.

असा तपासून पहा निकाल

  • सीयूईटी यूजी 2025 निकाल तपासून पाहण्यासाठी एनटीएची अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in येथे भेट द्या. यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपली गुणपत्रिका डाउनलोड करू शकता.
  • सीयूईटी यूजी 2025 निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर होमपेजवर ‘CUET UG 2025 Scorecard/Result’ निकाल पर्यायावर क्लिक करा.
  • सीयूईटी यूजी अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख अशी माहिती द्या.
  • सीयूईटी यूजीची पीडीएफ फाइल डाउनलोड करुन प्रिंट काढा. सीयूईटी यूजी काउंसिलिंग 2025 दरम्यान तुमच्याकडे गुणपत्रिका असणे आवश्यक असणार आहे.

सीयूईटी यूजीचा पासवर्ड विसरल्यास काय करावे? यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • सीयूईटी यूजीचा पासवर्ड विसरल्यास‘Forgot Password’ चा पर्याय निवडा.
  • सिक्युरिटी प्रश्न, एसएमएस किंवा ईमेल व्हेरिफाय करा.
  • जर सीयूईटी यूजीचा रजिस्ट्रेशन क्रमांक विसरल्यास तुमच्या ईमेल आयडी, एसएमएस किंवा कंफर्मेशन पेजवरील माहिती तपासून पहा. अथवा एनटीएच्या हेल्पलाइनलाही संपर्क करू शकता.
  • पासवर्डच्या मदतीने लॉग इन होत नसल्यास अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा. क्रेडेंशियल मिळाल्यानंतर किंवा रिसेट केल्यानंतर CUET पोर्टवर जाऊन निकाल तपासून पहा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द