MLC Election Results l संजय राऊतांचा मोदींना नागपूरच्या निकालावरून टोला

MLC Election Results l संजय राऊतांचा मोदींना नागपूरच्या निकालावरून टोला

Published : Oct 29, 2026, 01:02 PM IST

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवारांची प्रतिमा, संपर्क आणि पक्षाचे नेतृत्व यावर विजय अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा वापर आणि मतांची खरेदी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच्या पराभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटवर राऊत यांनी टीका केली. नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर ट्वीट हटवावे लागल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पदवीधर मतदारांनी भाजपला नाकारल्याचे सांगत नागपूर, वाराणसी आणि लखनऊमधील पराभवाचा उल्लेख केला. बॅलेट पेपरवरील निवडणुकीतही भाजपचा पराभव झाल्याचे त्यांनी म्हटले.