मनोज जरांगे यांचा दावा, सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या | Maratha | Reservation | Maharashtra

Published : May 31, 2026, 03:00 PM IST

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषण संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाले नसले तरी मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या चर्चेनंतर बहुतांश मागण्या मान्य झाल्याचा दावा त्यांनी केला. मंगळवारपासून रखडलेले निर्णय, कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजातील युवकांनी शांतता राखावी, सामाजिक तणाव वाढू देऊ नये आणि सरकारला निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.