Mann Ki Baat : मन की बातचा 110 वा भाग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमो ड्रोन दीदीशी बोलून विचारले - प्रवास कसा सुरू झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रदर्शित झाला आहे. यात त्यांनी ड्रोन दीदीसोबत संवाद साधला. 

Mann Ki Baat : रविवार (25 फेब्रुवारी) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातचा (Mann Ki Baat) चा 110 वा भाग आहे. पंतप्रधान आपले विचार देशवासीयांशी शेअर करत आहेत. 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली.

ते म्हणाले की, “भारताची महिला शक्ती (Women Power) प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची नवीन उंची गाठत आहे. आपल्या देशातील खेडेगावात राहणारी महिलाही ड्रोन उडवेल, असा विचार काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणी केला नसेल. आज नमो ड्रोन (Namo Drone) दीदी सर्वांच्या ओठावर आहे. ड्रोन उडवणाऱ्या सुनीता या महिलेशी पंतप्रधान बोलले. त्यांनी सुनीता यांच्याकडून तिचे कुटुंब, अभ्यास आणि ड्रोन दीदी बनण्याच्या प्रवासाविषयी माहिती घेतली.

मन की बात कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर प्रसारित केला जात आहे. यासोबतच आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूजनेअर मोबाईल ॲपवरही तो थेट ऐकता येईल. ऑल इंडिया रेडिओ, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील तो थेट प्रक्षेपित केला जातो. हिंदी प्रसारणानंतर लगेचच ऑल इंडिया रेडिओ प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करेल.

आणखी वाचा -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातून 19 वर्षीय तरुणाला अटक
Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आता आंदोलन करण्याचा हट्ट थांबवावा", देवेंद्र फडवणीस यांचे मनोज जरांगेंना आवाहन
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 प्रदान

Share this article