प्रताप सरनाईक: उद्यापासून स्थळ पंचनामे सुरू | Maharashtra Drought

प्रताप सरनाईक: उद्यापासून स्थळ पंचनामे सुरू | Maharashtra Drought

Published : Sep 22, 2026, 09:02 PM IST

प्रताप सरनाईक यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून स्थळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांत जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरनाईक तुळजापूर आणि कळम तालुक्यांचा दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सॅटेलाईट इमेजऐवजी प्रत्यक्ष स्थळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सरनाईक म्हणाले. मीरा-भाईंदरमध्ये गेल्या काही महिन्यांत हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी आणि जैन-मराठी असे वाद राजकीय फायद्यासाठी निर्माण केले जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. संबंधित शाळांना नोटिसा देण्यात आल्या असून बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. IIT विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी वडिलांची तक्रार आली असून या प्रकरणाची चौकशी होईल; मात्र शिक्षण क्षेत्रात त्याला जातीय रंग देणे चुकीचे असल्याचेही सरनाईक म्हणाले.