Lok Sabha Elections 2024 : पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक श्रीमंत आणि गरीब उमेदवार कोण? जाणून घ्या सविस्तर...

First Phase Voting : पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी एकूण 1625 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 135 महिला उमेदवार आहेत. जाणून घेऊया पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक श्रीमंत आणि गरीब उमेदवार कोणाच्या पक्षात आहे याबद्दल सविस्तर...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला आजपासून (19 एप्रिल) सुरूवात झाली आहे. देशभरातील 102 मतदार संघात मतदान होणार असून एकूण 1652 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 135 महिला उमेदवार आहेत.

दुसऱ्या बाजूला पहिल्या टप्प्यात 161 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यापैकी सात उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर हत्या आणि 19 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय आठ उमेदवारांवर महिलांच्या विरोधातील गुन्हे आणि एकाच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हाही दाखल आहे.

कोट्यावधीच्या संपत्तीचे मालक असणारे उमेदवार
पहिल्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले 450 उमेदवार करोडपती आहेत. यामध्ये 19 भाजपचे उमेदवार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार आहे. काँग्रेसमधील 49 उमेदवार करोडपती आहेत. अन्नाद्रमुकचे 35, द्रमुकचे 21 आणि बसपाचे 18 खासदार कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. टीएमसी आणि आरजेडीचे प्रत्येकी 4-4 उमेदवार करोडपती आहेत. (Pahila Tappatil sarvadhik shrimant and garib umedwar kon?)

नकुलनाथ यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती
काँग्रेस (Congress) पक्षाचे छिंदवाडा येथील उमेदवार नकुलनाथ (Nakul Nath) यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली. यानुसार, नकुलनाथ यांच्याकडे 716.94 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अशातच पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार नकुलनाथ आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एआयडीएमकेचे (AIDMK) उमेदवार अशोक कुमार (Ashok Kumar) आहेत. यांच्याकडे 662.46 कोटी रुपयांची संपत्ती आहे. भाजपचे देवनाथन यादव टी यांच्याकडे 304.92 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

10 उमेदवारांकडे शून्य संपत्ती
पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या 10 उमेदवार असे आहेत ज्यांची शून्य संपत्ती आहे. उमेदवार अर्ज दाखल करताना त्यांनी शून्य संपत्ती दाखवली आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये पोनराज के (थुथुक्कूडी), सुरयामुथु (चेन्नई उत्तर) यांच्याकडे सर्वाधिक कमी संपत्ती आहे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 First Phase Voting Live Updates : भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा- अमित शाह

TMC च्या उमेदवार महुआ मोइत्रांच्या उर्जेचा स्रोत काय? पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाल्या..... (Watch Video)

Read more Articles on
Share this article