Lok Sabha Election 2024 : EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला का फटकारले ?

ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केरळमधून ईव्हीएमच्या विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल. 

Ankita Kothare | Published : Apr 18, 2024 1:17 PM IST

दिल्ली : ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून केलं जावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. VVPAT ही एक स्वतंत्र मत पडताणळीसाठी वापरली जाणारी प्रणाली आहे. जी मतदाराला त्याचे मत बरोबर टाकले आहे की नाही याची माहिती देते.

आज झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाचे उत्तर ऐकून सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला फटकारले आहे. ईव्हीएममधील घोळ आणि अन्य पक्षांची मतं भाजपला हस्तांतरित होत असल्याच्या केरळमध्ये झालेल्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस देखील धाडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

केरळच्या कासरगोडमध्ये घेण्यात आलेल्या मॉक पोलमध्ये भाजपाच्या बाजूने अतिरिक्त चार मते पडली आहेत, असा आरोप केरळमधील सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (LDF) आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांनी केला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. केरळच्या कासरगोडमध्ये एक मॉक पोल झाला. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये भाजपाला अतिरिक्त चार मत नोंदवत आहेत,असे यावेळी लक्षात आले. अहवालाचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

EVM मशीनवरून काथ्याकूट :

सध्या एका लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅट-ईव्हीएम पडताळणी पाचपर्यंत मर्यादित आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्व व्हीव्हीपीएटी स्लिप मोजण्याची मागणी केली होती. तसंच, मतपत्रिका पद्धती पुन्हा स्वीकारावी असं मतही मांडलं होतं. न्यायालयानं त्यावर आपलं मत मांडलं.

मतदारांना मतदान कोणाला केले याची स्लिप मिळेल का ?

कोर्टाने विचारलं की, मतदारांना त्यांनी कुणाला मतदान केलं याची स्लिप मिळू शकते का? त्यावर आयोगाने स्पष्टीकरण दिलं की, असं होऊ शकतं. परंतु त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो. शिवाय जेव्हा वोटिंग स्लिप बूथच्या बाहेर पोहोचतील तेव्हा मतदाराला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. या स्लिपचा काही लोक कसा उपयोग करतील, हे सांगता येणार नाही.

आणखी वाचा :

TMC च्या उमेदवार महुआ मोइत्रांच्या उर्जेचा स्रोत काय? पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाल्या..... (Watch Video)

Loksabha Election 2024 : नकुलनाथ आणि नितीन गडकरी हे आहेत मुख्य उमेदवार, जाणून घ्या गोष्टी

Read more Articles on
Share this article