गणेश विसर्जनादरम्यान हासनमध्ये भीषण अपघात झाला आहे. मोसळेहोसाळ्ळी गावात कंटेनर ट्रक गणेश विसर्जन मिरवणुकीत शिरल्याने ८ जण जागीच ठार झाले असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला.
भरधाव कंटेनर ट्रक मिरवणुकीत शिरल्याने ८ जण जागीच ठार झाले तर २० जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्त नाचत, गात असताना हा प्रकार घटला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
25
अवयवांचा चिखल
हा अपघात झाल्यानंतर लगेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काहींचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या अवयवांचा अक्षरशः चिखल रस्त्यावर पडला होता.
35
बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात
बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ट्रक कंटेनर मिरवणुकीवर चढवला. त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला आहे.
तीन गणेश भक्तांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
55
घटनास्थळी रक्तच रक्त
कंटेनर ट्रक भाविकांच्या गर्दीत शिरल्याने घटनास्थळी रक्त आणि मांस दिसून येत होते. विसर्जन मिरवणुकीतील वातावरण लगेच बदलले. अनेकांनी आपल्या नातलगांना गमावले होते.