'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar

'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar

Published : Oct 09, 2026, 09:06 PM IST

CEC ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील दिल्लीतील CJP आंदोलनापूर्वी रेल्वे, मेट्रो आणि रस्ते बंद केल्याचा आरोप करत अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. आंदोलनाच्या भीतीने जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागांतून सुरक्षा दलं दिल्लीत आणल्याचा दावाही त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी 13 कोटी मतदारांची नावं वगळल्याचा आरोप करत संविधानाच्या कलम 19 अंतर्गत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं दिपके म्हणाले. जंतर-मंतर हे आंदोलनासाठी निश्चित ठिकाण असल्याने परवानगीचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. बंगळुरूमध्ये जिवंत मतदारांना मृत घोषित करून त्यांची नावं वगळल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार ज्ञानेश कुमार यांना का वाचवत आहे, असा प्रश्न उपस्थित करत अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला. आंदोलनासाठी परदेशी पाठिंब्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

07:15Supriya Sule | दुष्काळग्रस्तांसाठी सुप्रिया सुळेंची फूड पॅकेज मागणी
03:21Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी ट्रॅक्टर चालवून केला गाळ उपसा
05:53Nishikant Dubey | मारुती प्रकरणी सोनिया गांधींवर निशिकांत दुबेंचे आरोप
02:51Uddhav Thackeray | हुतात्मा स्मारकात उद्धव ठाकरे-अरविंद सावंतांचं अभिवादन
05:08Sanjay Raut | Maharashtra Drought Relief | २२ लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर संजय राऊतांचा प्रश्न
08:49Chandrashekhar Bawankule | पडीत जमिनींबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
03:56Devendra Fadnavis | Sunetra Pawar | हुतात्मा चौकात फडणवीस-सुनेत्रा पवारांचं अभिवादन
04:07Gulabrao Patil l मंत्री गुलाबराव यांचा तरुण आमदारांना सल्ला
05:53Jalgaon JDCC Bank : आमदार किशोर आप्पांना सांगेल मुलाला आवर घाला - आमदार मंगेश चव्हाण
05:01Jalgaon JDCC Bank : भाजप आमदाराला, शिवसेना आमदाराच्या मुलाकडून शिव्या देऊन चॅलेन्ज