
आज मंगळवारी पहाटे ५ वाजता दिल्लीवरून जाणाऱ्या विमानातबॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे या इंदिरा गांधी विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले आणि येथे बॉम्बची तपासणी करण्यात आली. एव्हिएशन सिक्युरिटी, डॉग स्क्वाड आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी विमानाची तपासणी केली. यावेळी बॉम्बची बातमी समजताच प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारण्यास सुरुवात केल्याने विचित्र दृश्य पाहायला मिळाले. आता या विमानाचा नवीन व्हिडीओ देण्यात आला आहे.
इमर्जन्सी प्रवाशांना कसे काढले बाहेर? -
इमर्जन्सी प्रवाशांना इंडिगोने विमानातून बाहेर काढले. यावेळी प्रवाशांना बाहेर काढत असताना पायऱ्यांच्या जागेवर घसरून बाहेर जात येईल अशा स्वरूपाची कंपनीने सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवाशी त्यावरून घसरून विमानातून बाहेर पडले. विमानातून बाहेर पाडण्यासाठी विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मदत केली आणि दुसऱ्या बाजूला एअर होस्टेसने प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. यावेळी एअर होस्टेसने प्रवाशांचे हात धरून बाहेर काढल्याचे दिसून आले.
इंडिगो एअरलाइनने निवेदन केले जारी -
इंडिगो एअरलाइनने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक 62E2211 वर बॉम्बची धमकी मिळाली आहे. यावेळी, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून आणि सुरक्षा राखून, विमान विमानतळाच्या मुख्य भागापासून दूर हलवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
आणखी वाचा -
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात सापडला बॉम्ब? त्यानंतर प्रवाशांनी मारल्या खिडकीतून उड्या
राजीव चौक स्थानकावरील दिल्ली मेट्रोला अचानक लागली आग, प्रवाशी खरंच सुरक्षित आहेत का?