नेहरूंच्या काळात चीनकडून भारतीय प्रदेशावर कब्जा! मालवीय यांची काँग्रेसवर टीका

चीनकडून भारतीय प्रदेशाच्या कब्जाबद्दल बोलण्यात काँग्रेसचा अप्रामाणिकपणा आहे. हा सगळा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घडला होता. असे भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करून म्हटले आहे.

नवी दिल्ली :  भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी भारत-चीन सीमावादावरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर एक्स( पुर्वीेचे ट्वीटर) वर एक पोस्ट करून टीका केली आहे. चीनकडून भारतीय प्रदेशाच्या कब्जाबद्दल बोलण्यात काँग्रेसचा अप्रामाणिकपणा आहे. हा सगळा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घडला होता. असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे. सोबतच त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा व्हिडीओदेखील जोडला आहे. ज्यात जयशंकर यांनी भारत चीन सीमावादाचा इतिहास सांगून काँग्रेसवर टीका केली आहे.

अमित मालवीय यांनी ट्विट मध्ये काय म्हटले

पंतप्रधान मोदींवर नेहरूच्या विश्वासघाताचा दोष लावणे हास्यास्पद आहे!

चीनकडून भारतीय प्रदेशाच्या कब्जाबद्दल बोलण्यात काँग्रेसचा अप्रामाणिकपणा आहे. हा सगळा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घडला होता.

चीनने नुकतेच जाहीर केलेल्या नवीन काउंटीजबद्दल वास्तव हे आहे:

हेआन काउंटीचे महत्त्व G219 महामार्गामध्ये आहे, जो चीनने १९५७ साली अधिकृतपणे सुरू केला होता. पंतप्रधान नेहरूंनी १९५९ मध्ये संसदेत या महामार्गाच्या बांधकामाची कबुली दिली होती.

हेआन काउंटीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये यांचा समावेश आहे.

राहुल गांधी काहीही म्हणत असले तरी काँग्रेस अशा खोट्या गोष्टींपासून सुटू शकत नाही.

 

 

आणखी वाचा-

प्रयागराज कल्पवास २०२५: कधीपासून सुरू होईल?

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दमानियांनी तपासावर उचलले गंभीर प्रश्न, धमकीचे आरोप!

Share this article