भारतीय नौसेनच्या जवानांनी 19 पाकिस्तानी नागरिकांचा वाचवला जीव, सोमालियाच्या सागरी चाच्यांनी मच्छिमार जहाजावर मिळवला होता ताबा

भारतीय नौसेनेच्या जवानांनी इराणचा ध्वज असणारे जहाज अल नईमला सोमालियातील सागरी चाच्यांच्या ताब्यातून सोडवले आहे. याशिवाय जहाजावर असलेल्या 19 पाकिस्तानी नागरिकांचा जीव देखील वाचवण्यात आला आहे.

Anti-Piracy Operation : अरबी समुद्रात भारतीय नौसेनेकडून (Indian Navy) सातत्याने सागरी चाच्यांच्या विरोधात कार्यवाही केली जात आहे. अशातच आता भारतीय नौसेनेकडून आणखी एक सागरी चाच्यांच्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे.

इराणचा ध्वज असणारे जहाज सोमालियातील (Somalia) सागरी चाच्यांच्या ताब्यातून मुक्त केले आहे. सशस्त्र सागरी चाच्यांनी जहाजावर ताबा मिळवला होता. नौसेन्याने जहाजाला सागरी चाच्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासह त्यावरील चालक दलाच्या 19 जणांचा जीवही वाचवला आहे. चालक दलातील सर्वजण पाकिस्तानातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेसंबंधित सोशल मीडियावर पोस्ट
नौसेनेच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर घटनेबद्दल अधिक माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले की, अल नईम नावाच्या जहाजाने (मच्छिमार जहाज) मदतीची विनंती केली होती. त्यावेळी अपहरण करण्यात आलेल्या जहाजाजवळ भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्रा (INS Sumitra) होती. आयएनएस सुमित्राला सागरी चाच्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पाठवले होते.

भारतीय नौसेनेकडून अपहरण करण्यात आलेल्या जहाजाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सशस्र सागरी चाच्यांनी जहाजावर ताबा मिळवल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या फोटोंमध्ये जहाजावर नौसेनेचे हेलिकॉप्टर दिसतेय. तिसऱ्या फोटमधये नौसेनेच्या कमांडर यांच्यासमोर सागरी चाच्यांनी आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे.

जहाजावर 11 सोमालियातील सागरी चाच्यांची ताबा मिळवला होता. जहाज कोची (Kochi) येथून 850 किलोमीटर दूर पश्चिमेला असणाऱ्या दक्षिण अरबी समुद्रात होते. याआधी सोमवारी (29 जानेवारी) आयएनएस सुमित्राने एमवी इमान जहाजाला वाचवले होते. मच्छिमारांच्या जहाजाचे सोमालियातीलच सागरी चाच्यांनी अपहरण केले होते. या जहाजावरील 17 जणांना समुद्री चाच्यांनी पकडले होते.

आणखी वाचा : 

ईडीकडून हेमंत सोरेन यांची BMW कार जप्त, दिल्ली विमानतळावरही EDची नजर

Lok Sabha Elections : इंडिया आघाडीला दुसरा झटका, ममता बॅनर्जींनंतर AAP पक्षाची पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

Mynmar Army Aircraft Crashes : लेंगपुई विमानतळावर मान्यमार सैन्याच्या विमानाला अपघात, सहा जण जखमी

Share this article