चार बँकांमध्ये एफडी केली तर मिळेल चांगला परतावा, आपणही ही संधी चुकवू नका

आपण एफडी करून चांगला परतावा मिळवू शकता. यासाठी कोणत्या बँकेत एफडी करायला हवी हे माहित करून घ्यायला हवे. 

vivek panmand | Published : May 12, 2024 9:59 AM IST

आपण प्रत्येकजण सध्याच्या काळात विविध ठिकाणावरून चांगला परतावा कसा मिळवता येईल याकडे लक्ष देत असतो. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येत नाही. चांगल्या गुंतवणूक पर्यायातूनच भविष्यात आपल्याला परतावा मिळत असतो. आपण विविध फिक्स्ड डिपॉझिट पद्धतींमध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्यामधून नियमित सुरक्षित असा परतावा मिळू शकतो. 

सिटी युनिअन बँक - 
आपण सिटी युनिअन बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करून चांगला परतावा मिळवू शकता. सिटी युनिअन बँकेने त्यांच्या व्याजदरात बदल केला आहे. या बँकेमध्ये आपल्या एफडीवर 5 ते 7.25 टक्के व्याजदर दिला जातो. आपण जर 400 दिवस एफडीमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला मिळणारा व्याजदर हा 7.25% असतो.

आरबीएल बँक - 
आरबीएल बँकेतूनही आपल्याला चांगला परतावा सहजपणे मिळतो. या बँकेतून आपण आपल्या ठेवीवर चांगला परतावा सहजपणे मिळवू शकता. जर या बँकेत दोन कोटींपर्यंतच्या ठेवी ठेवण्यात आल्या तर आपल्याला या बँकेमध्ये आठ टक्क्यांपर्यंत परतावा सहजपणे मिळू शकतो. 

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक - 
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. या बँकेमध्ये आपण दोन कोटींपर्यंतची एफडी करू शकणार आहेत. या बँकेकडून एफडीवर आता चार टक्क्यांपासून ते 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक - 
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ठेवीदारांना चांगला परतावा देणार आहे. या बँकेतील ठेवीदारांना दोन कोटीपर्यंतची एफडी करता येणार आहे. या बँकेमध्ये चारशे दिवसांच्या एफडीवर चांगला परतावा दिला जाईल असे सांगण्यात आले आहे. 
आणखी वाचा - 
इस्रायलने गाझावर क्षेपणास्त्रे डागली, रफाहमध्ये बॉम्बचा वर्षाव झाला असून शहर रिकामे करण्याचा दिला इशारा
मुंबई इंडियन्सच्या पराभवावर कर्णधार हार्दिक पांड्याने केले भाष्य, अखेर सांगितले असे सत्य की...

Share this article