भाजपाने मातृदिनानिमित्त शेअर केले मोदींच्या आईबरोबरचे भावनिक क्षण

Published : May 12, 2024, 02:10 PM IST
modi mothers day 2024

सार

देशभर मातृदिन साजरा केला जातो आहे. यातच भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या नात्याला उजाळा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही भारतभूमीही त्यांची आईच आहे असंही या व्हीडिओत सांगण्यात आले आहे. 

देशभर मातृदिन साजरा केला जातो आहे. यातच भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या नात्याला उजाळा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही भारतभूमीही त्यांची आईच आहे असंही या व्हीडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या आईविषयी असलेलं प्रेम सादर करण्याचा मातृदिन हा दिवस. आईप्रती असलेली माया, विश्वास दाखवण्याकरता आज सगळेच तिच्याविषयी पोस्ट करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आपल्या आईची सेवा करत असत. गेल्यावर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. परंतु, तरीही त्यांच्या आईची छबी त्यांच्या हृदयातून अद्याप गेलेली नाही. “एक मां ने मुझे जन्म दिया, हजारों ने मुझे जनसेवक से प्रधानसेवक बनाया, मैंने मां की सेवा में अपना तन-मन और जीवन अर्पण किया…”, असं भाजपाने पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच, एक व्हीडिओही पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईंनी एकत्र घालवलेले क्षणचित्र देण्यात आले आहेत.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे ३० डिसेंबर २०२२ ला वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक खासप्रसंगी आईचे आशीर्वाद घेण्यास जात असत. त्यांच्या भेटीचे अनेक फोटोही सोशल मीडियावर येत असत. आईवरील प्रेम व्यक्त करताना त्यांनी या भारतभूमीविषयी असलेलं प्रेमही व्यक्त केले आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!
Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून