Child Marriage In Hyderabad : १७ वर्षांच्या मुलीचं ४२ वर्षांच्या नवरदेवासोबत लग्न, पोलिसांनी असा उधळला डाव

Published : Oct 28, 2026, 02:27 PM IST
Child Marriage In Hyderabad : १७ वर्षांच्या मुलीचं ४२ वर्षांच्या नवरदेवासोबत लग्न, पोलिसांनी असा उधळला डाव

सार

हैदराबादच्या कालापथर भागात १७ वर्षांच्या मुलीचं ४२ वर्षांच्या व्यक्तीसोबत होणारं लग्न पोलिसांनी उधळून लावलं आहे. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : हैदराबाद पोलिसांनी कालापथर भागात एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं ४२ वर्षांच्या व्यक्तीसोबत होणारं लग्न थांबवलं आहे. पोलिसांनी नवरदेवासह पाच जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मुलीने पुढील शिक्षणासाठी पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कालापथरमधील बिर्याणी शाह टेकरी इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कालापथर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, चारमिनार झोन टास्क फोर्स आणि महिला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी लग्नाचा सोहळा सुरू असल्याचं पोलिसांना दिसलं.

४२ वर्षीय नवरदेवाचं नाव आरिफ अली बेग असं असून तो फलकनुमा येथील जहानुमा भागात राहणारा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो दुबईत कॅब ड्रायव्हर म्हणून काम करतो.

लग्न लागण्यापूर्वीच पोलिसांनी मध्यस्थी करत हा सोहळा थांबवला. त्यानंतर चाईल्ड मॅरेज हेल्पलाईनला याची माहिती देण्यात आली. अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यानंतर हे लग्न लावून देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला.

याप्रकरणी कालापथर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ च्या कलम १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेव आरिफ बेग, काझी मोहम्मद जहांगीर, मध्यस्थी करणारी शाहीन आणि अल्पवयीन मुलीचे आई-वडील अशा पाच जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केल्यामुळे मुलीच्या हक्कांचं रक्षण झालं आणि तिला तिचं शिक्षण सुरू ठेवता आलं, असं पोलिसांनी सांगितलं.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Supreme Court On Election Commission: मतदानाचा हक्क कायमचा हिरावून घेता येईल का? ४३ लाख मतदार गेले कुठे? सुप्रीम कोर्टाचा सवाल
Raj Thackeray Karjat Speech | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | Karjat Torrent