LIC Claim : देशभरात लाखो लोक एलआयसीधारक आहेत. सामान्य लोक एलआयसीमध्ये गुंतवणूक करतात, जेणेकरून ती रक्कम गरजेच्या वेळी उपयोगी पडेल. LIC धारकाचा मृत्यू झाल्यावर काय करावे? अशा स्थितीत रकमेचा दावा कसा केला जातो? आपल्याला माहित नसेल तर याबद्दलची माहिती जाणून घ्यायला हवी.
LIC दाव्याची प्रक्रिया काय आहे?
LIC शी संबंधित दाव्याची रक्कम मिळविण्यासाठी खालील पद्धतींचे पालन करा.
पॉलिसी (Policy) केली होती त्या पॉलिसीच्या ब्रांचला भेट द्या.
पॉलिसीधारकाच्या मृत्यूची माहिती तेथे द्या.
शाखा अधिकारी नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात निधी हस्तांतरणासाठी फॉर्म 3783, 3802 आणि NEFT फॉर्म देईल.
एनईएफटी फॉर्मसह, नामनिर्देशित व्यक्तीने रद्द केलेला चेक आणि पासबुकची छायाप्रत जमा करावी लागेल.
या फॉर्म्ससोबत, मृत्यू प्रमाणपत्र, पॉलिसी बाँड, नॉमिनीच्या पॅन कार्डची प्रत, आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यासारखी आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
लक्षात ठेवा की, सर्व कागदपत्रे नॉमिनीने स्व-साक्षांकित केलेली असावीत.
नामनिर्देशित व्यक्तीला एक घोषणापत्र देखील सादर करावे लागेल. यामध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूची तारीख, ठिकाण आणि कारण याची माहिती द्यावी लागेल.
या गोष्टी अजिबात विसरू नका
कागदपत्रे सादर करताना मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत.
पडताळणीसाठी तुम्ही तुमचे पॅन कार्ड, मृत व्यक्तीचा ओळखपत्र आणि मूळ पासबुक ठेवावे.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावती घेण्यास विसरू नका.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका महिन्याच्या आत दाव्याची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. जर तुमच्या खात्यात रक्कम येत नसेल, तर पावतीसह एलआयसीच्या गृह शाखेत जा आणि स्थितीबद्दल माहिती मिळवा.