हे मंत्री पुन्हा चढणार बोहल्यावर, जाणून घ्या त्यांच्या नववधू डॉ. अमरीन कौर आहेत तरी कोण!

Published : Aug 19, 2025, 06:37 PM IST

हिमाचल प्रदेशचे मंत्री आणि बुशहर राजघराण्याचे वारस विक्रमादित्य सिंह दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. त्यांचा विवाह डॉ. अमरीन कौर यांच्याशी होणार असून त्या चंदीगड येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहेत. विवाह सोहळा २२ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.

PREV
17
पहिल्या पत्नीपासून विभक्त

विक्रमादित्य सिंह यांचे पहिले लग्न राजस्थानच्या राजघराण्यातील राजकुमारी सुदर्शना सिंह यांच्याशी झाले होते. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला.

27
लग्नाची वेळ व सोहळा

या दुसऱ्या विवाहाच्या सर्व धार्मिक विधी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होतील. त्यानंतर दुपारी १ वाजता पाहुण्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम असेल. लग्नाचे आमंत्रणपत्रही बाहेर आले असून सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात या विवाहाची चर्चा जोरात आहे.

37
कोण आहेत डॉ. अमरीन कौर?
  • अमरीन कौर या व्यवसायाने शिक्षणतज्ज्ञ आहेत.
  • सध्या त्या पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड येथे मनोविज्ञान (Psychology) विषयाच्या असिस्टंट प्राध्यापक आहेत.
  • त्यांनी इंग्रजी आणि मनोविज्ञान या दोन्ही विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि मनोविज्ञान विषयात पीएचडी केली आहे.
  • विशेष म्हणजे त्यांनी काही काळ अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्येही शिक्षण घेतले आहे.
47
कुटुंबाची माहिती
  • अमरीन प्रतिष्ठित कुटुंबातून येतात.
  • त्यांचे वडील स. जोतिंद्र सिंह सेखो पंजाब व हरियाणा हायकोर्टमधील वरिष्ठ वकील आहेत.
  • त्यांची आई ओपिंद्र कौर सामाजिक कामांशी जोडलेल्या आहेत.
57
पहिली पत्नी सुदर्शना

विक्रमादित्यची पहिली पत्नी राजकुमारी सुदर्शना होत्या. २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले तर नंतर घटस्फोट झाला. त्याही दिसायला खूप सुंदर होता. दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने हे नाते टिकू शकले नाही.

67
विक्रमादित्य सिंह व अमरीन यांची एक नवी सुरुवात

मंत्री असलेले आणि राजघराण्याशी निगडित असलेले विक्रमादित्य आता अमरीनसोबत नवे आयुष्य सुरू करत आहेत. त्यांच्या या विवाहाकडे हिमाचल, पंजाबच नव्हे तर राजस्थानमध्येही सर्वांचे लक्ष लागले आहे.

77
अमरीन आणि विक्रमादित्य यांची जुनी मैत्री

माहितीनुसार, डॉ. अमरीन या विक्रमादित्य यांच्या जुना परिचय असलेल्या मैत्रिणी आहेत. अमरीन वयाच्या सुमारे ३५ वर्षांच्या असून त्यांचा हा पहिलाच विवाह असेल.

Read more Photos on

Recommended Stories