विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, ‘ASIअहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे की, हे संकुल हिंदूंचे प्रार्थनास्थळ होते, जे पाडण्यात आले. आता सर्वकाही स्पष्ट झाले असल्याने ते हिंदूंना पुन्हा सोपवले पाहिजे’.
Gyanvapi Campus Row : वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणामध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा (Archaeological Survey of India) अहवाल प्रकाशित करण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी ज्ञानवापी संकुलावर (Gyanvapi Structure) दावा करण्यास सुरुवात केली आहे.
ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) केली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) म्हणाले की, “भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे की, हे संकुल हिंदूंचे प्रार्थनास्थळ होते, जे पाडण्यात आले. आता सर्वकाही स्पष्ट झाले असल्याने ते हिंदूंना पुन्हा सोपवले पाहिजे”.
आलोक कुमार नेमके काय म्हणाले?
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी म्हटले की, “भव्य मंदिर पाडल्यानंतर त्यावर मशीद बांधण्यात आली होती, याची पुष्टी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ज्ञानवापी संरचनेतून जमा केलेले पुरावे करताहेत. मंदिराच्या संरचनेचा एक भाग, विशेषत: पश्चिमेकडील भिंत हे हिंदू मंदिराचे अवशेष आहे.
मंदिराच्या स्तंभांसह पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचे काही भाग मशिदीच्या बांधणीकरिता पुन्हा वापरण्यात आले होते, हे देखील अहवालामध्ये सिद्ध झाले आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग आहे, त्यानुसार येथे मशीद नाही; हे स्पष्ट होते. संरचनेत सापडलेल्या शिलालेखांमध्ये जनार्दन, रुद्र आणि उमेश्वरासह नावांचा शोध हे मंदिर असल्याचा स्पष्ट पुरावा आहे”.
“आमचा कायदेशीर अधिकार”
आलोक कुमार (Alok Kumar) यांनी असेही म्हटले की, “या प्रार्थनास्थळाचे धार्मिक वैशिष्ट्य 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात होते आणि सध्या ते हिंदू मंदिर आहे, ही बाब भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जमा केलेले पुरावे व सादर केलेले निष्कर्ष सिद्ध करतात. त्यामुळे पूजा स्थळ कायदा 1991च्या कलम 4नुसार या संरचनेला हिंदू मंदिर घोषित केले गेले पाहिजे”.
विश्व हिंदू परिषदेची मागणी आणि सूचना
आणखी वाचा
Nitish Kumar : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे
Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम