Bihar Political Crisis : बिहारच्या राजकारणामध्ये नेमके काय सुरू आहे, यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ रविवारी (28 जानेवारी) थांबवण्याची शक्यता आहे.
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) सकाळी 10 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीदरम्यान राज्यामध्ये पुढे नेमके काय होणार आहे? याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नेमके काय सुरू आहे, याबाबत रविवारी स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी नितीश कुमार यांनी बिहारामध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. यासह त्यांनी भाजपच्या दिशेनेही पहिले पाऊल टाकले होते. त्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार व भाजपामध्ये जवळीक वाढल्याचे संकेत मिळताहेत.
बिहारच्या राजकारणामध्ये काय सुरू आहे? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे
- नितीश कुमार (Nitish Kumar) आरजेडीची (RJD) साथ सोडून नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची तयारी करत आहेत, असे म्हटले जात आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदासह दोन उपमुख्यमंत्री देण्याची रणनीती भाजपने आखली आहे.
- नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) सकाळी 10 वाजता जेडीयू आमदारांची बैठक बोलावली आहे.
- बिहारमध्ये 22 आयएएस, 79 आयपीएस आणि 45 बीएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा बरखास्त करण्यात येणार नाही, तर पुढील वर्षापर्यंत निवडणुकीची वाट पाहिली जाणार आहे.
- भाजप आणि जेडीयू या पक्षांना कोणतीही घाई नाही. कारण दोन्ही पक्षांचे लक्ष वर्ष 2024च्या लोकसभा निवडणुकांवर केंद्रीत आहे.
- नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली, या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये आरजेडी पक्ष सहभागी झाला नव्हता.
- नितीश यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आरजेडीचे नेते मनोज झा यांनी म्हटले आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी 28 जानेवारीचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna 2024) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. याबाबत नितीश कुमार यांनी 'X'वर पोस्ट शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले.
"स्वर्गीय कर्पूरी ठाकूरजींना 'भारतरत्न' देण्याची आम्ही नेहमीच मागणी करत होतो. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. त्याबाबत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार", असे ट्वीट नितीश कुमार यांनी केले होते.
आणखी वाचा :
PM Narendra Modi : भाजपचा जाहीरनामा कसा असावा? NaMo अॅपद्वारे थेट पंतप्रधान मोदींना पाठवा सूचना
Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम