बिहारमध्ये तापललेल्या राजकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप लावला आहे. केजरीवाल यांनी म्हटले की, भाजप दिल्लीतील सरकार पडण्याचा प्रयत्न करतेय.
Delhi Politics : सध्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकरण तापले आहे. अशातच भाजप पक्ष दिल्लीत ऑपरेशन लोटस करू पाहात आहे. याशिवाय भाजपला (BJP) दिल्लीतील सरकार पाडायचे असल्याचेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) आमदारांना 25-25 कोटी रूपायांची भाजपकडून ऑफर दिली जात असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी भाजपवर लावला आहे. याआधी भाजपने मला मद्य धोरणावरुन ओढण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या बाजूला आमचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांची 'X' प्लॅटफॉर्मवरील पोस्ट
अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हटले की, केंद्र सरकार मला कधीही अटक करू पाहतेय. याशिवाय आम आदमी पक्षातील आमदारांना पक्षापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षातील सात आमदारांना भाजपकडून संपर्क करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भाजपने पक्षातील 21 आमदारांना संपर्क केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. अन्य आमदारांना देखील भाजप संपर्क करत असल्याचे केजरीवाल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार
अरविंद केजरीवाल यांनी ईडीला एक-दोन नव्हे चार नोटीसचे उत्तर फक्त एक चिठ्ठी लिहून दिले आहे. खरंतर केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. यामुळे असेही दिसतेय की, याच आधारावर ईडीकडून केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते.
दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल यांनी असा दावा केलाय की, दिल्लीतील मद्य धोरणावरुन त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये केजरीवाल यांनी भाजप दिल्लीत ऑपरेशन लोटस करत असल्याचा आरोपही लावला आहे.
आणखी वाचा :