दिल्लीत पुन्हा प्रदूषणात वाढ; GRAP-4 लागू, AQI 400 पार

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक बनत असल्याने पुन्हा GRAP-4 लागू करण्यात आला आहे. बांधकाम आणि पाडकामांसह अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. AQI 400 पार गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली: सध्या दिल्लीतील प्रदूषणाची पातळी अधिक धोकादायक बनताना दिसत आहे. दिल्लीची हवा पुन्हा विषारी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोमवारी रात्री 10 वाजता एक्यूआय (Air Quality Index) पुन्हा ४०० पार गेला आहे.

प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, CPBC आणि पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या CAQM ने(Commission for Air Quality Management) तातडीची बैठक बोलावली. त्यातच दिल्लीत पुन्हा GRAP-4(Graded Response Action Plan) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. दिल्लीत 16 डिसेंबरपर्यंत GRAP-3 लागू होता. यासंदर्भात अनेक निर्बंध हटवण्यात आले.

बांधकामावर बंदी

GRAPमुळे महामार्ग आणि उड्डाणपूल यांसारख्या सार्वजनिक प्रकल्पांसह सर्व प्रकारच्या बांधकाम आणि पाडण्याच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. GRAP-4 अंतर्गत इयत्ता 9 वी ते 11 वी पर्यंतचे वर्ग देखील हायब्रीड पद्धतीने आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर इयत्ता 10वी आणि 12 वीचे वर्ग कसे शिकवायचे याचा निर्णय शाळेवर सोडण्यात आला आहे. हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी GRAP-3 लागू करण्यात आला होता. सोमवारी AQI 379 होता. रोहिणीमध्ये AQI 451, IT मध्ये 425, मंदिर मार्गात 412, मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये AQI 411 नोंदवण्यात आले आहेत.

हवेची गुणवत्ता कशी मोजली जाते?

वास्तविक दिल्लीतील हवा पूर्णपणे शांत झाली आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे. याशिवाय दिल्लीत धुकेही वाढत आहे. जर AQI 0 ते 50 च्या दरम्यान नोंदवले गेले तर ते चांगले मानले जाते. तर, 51 ते 100 AQI समाधानकारक मानले जाते, जर 101 ते 200 AQI कोणत्याही ठिकाणी नोंदवले गेले तर ते मध्यम मानले जाते. 201 ते 300 मधील AQI खराब मानला जातो. 301 ते 400 मधील AQI अत्यंत खराब मानला जातो आणि 401 ते 500 मधील AQI गंभीर श्रेणीमध्ये समाविष्ट केला जातो. आता या आकडेवारीनुसार तुम्ही दिल्लीच्या स्थितीचा अंदाज लावू शकता.

आणखी वाचा-

एअर इंडियात 'भयानक प्रवास', यूट्यूबरने शेअर केला अनुभव

जै श्रीराम म्हणणे गुन्हा कसा?: सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Share this article