केरळमध्ये होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, हे आपल्याला माहित आहे. कोल्लमजवळील एका प्रख्यात कोट्टणकुलंगरा मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता.
केरळमध्ये होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, हे आपल्याला माहित आहे. कोल्लमजवळील एका प्रख्यात कोट्टणकुलंगरा मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. त्याचवेळी येथे चाकाखाली चिरडल्यामुळे एका पाच वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. आई वडिलांसोबत आलेली मुलगी चाकाखाली आल्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले.
तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिचा वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला अपयश आले. रविवारी रात्री हा अपघात झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. रथाला बांधलेली दोरी लहान मुले ओढत असतात, गर्दीत मुलांना रथाची दोरी ओढताना अचानक रथाच्या चाकाखाली आल्यावर समजत नाही. त्यामुळे या गर्दीतच मुलीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रात्री रथाची मिरवणूक चालू असताना मुलीचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोर ओढताना रथाच्या चाकाखाली येऊन मुलीचा मृत्यू झाला. रथ मिरवणूक सुरु असलेल्या मोकळ्या मैदानात ही घटना घडली होती. या घडलेल्या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा -
शिल्पकार अरुण योगीराज यांनी अयोध्येत बनवला राम लल्लाचा छोटा पुतळा, फोटो व्हायरल, पाहा
IPL 2024: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात एकमेकांना केली मारहाण; Video झाला व्हायरल