गीता प्रेसकडून रामचरितमानस मोफत डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे तुम्हाला आता रामचरितमानस पुस्तक वेगवेगळ्या भाषांमध्ये मोफत डाउनलोड करता येणार आहे.
Gita Press Free Ramcharitmanas Download : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर देशात रामचरितमानस पुस्तकाची मागणी अधिक वाढली गेली आहे. रामचरितमानस प्रकाशित करणाऱ्या गीता प्रेसला पुस्तकाची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य नाही. यामुळे गीता प्रेसने नागरिकांना रामचरितमानस मोफत डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे.
गीता प्रेसकडून रामचरितमानस डाउनलोड करण्याची सुविधा
गीता प्रेसने आपल्या एका अधिकृत विधानात म्हटले की, गीता प्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावरुन रामचरितमानस मोफत डाउनलोड करण्याची परवानगी नागरिकांना असणार आहे. प्रेसकडून 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याआधी पुस्तकांच्या प्रति नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार पूर्ण करणे अशक्य आहे.
गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणि त्रिपाठी यांनी म्हटले की, वर्ष 2022 मध्ये रामचरितमानसच्या जवळजवळ 75 हजार प्रत छापून विक्री करण्यात आल्या. पण अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर केल्यानंतर पुस्तकाची मागणी अधिक वाढली गेली. अशातच पुस्तकांची छपाई आणि वितरणाची मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याचेही त्रिपाठी यांनी म्हटले.
अचानक लाखोंच्या संख्येने पुस्तकाची छपाई करणे अशक्य
त्रिपाठी यांनी पुढे म्हटले की, रामचरितमानसची अचानक दोन ते चार लाख प्रत छापण्याची आणि उपलब्ध करून देण्याची तयारी आम्ही केलेली नाही. पण गेल्या महिन्यात आम्ही एक लाख पुस्तकाच्या प्रत छापल्या. यानंतर पुस्तकाची मागणी पुर्ण करता आली नाही. नुकत्याच जयपुरमधून 50 हजार आणि भागलपुर येथून 10 हजार पुस्तकांची मागणी आली होती. ती आम्हाला स्विकार करावी लागली. अशाप्रकारे संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने पुस्तकाची मागणी केली जात आहे.
रामचरितमानस मोफत करू शकता डाउनलोड
रामचरितमानस पुस्तकाच्या वाढत्या मागणीमुळे नागरिकांना पुरेश्या प्रत उपलब्ध करुन देता येत नाहीय. त्यामुळे आम्ही नागरिकांना मोफत ऑनलाइन पुस्तक डाउनलोड करण्याची सुविधा देणार असल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे. सध्या रामचरितमानसला गीता प्रेसच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून नागरिकांना रामचरितमानस मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध असणार आहे. या मोफत सुविधेच्या माध्यमातून 50 हजार जणांना पुस्तक डाउनलोड करता येणार आहे. पण रामचरितमानस पुस्तकाची मागणी वाढल्यास मोफत डाउनलोडची सुविधा एक लाखांपर्यंत केली जाऊ शकते.
वर्ष 1923 मध्ये स्थापन झाली होती गीता प्रेस
वर्ष 1923 मध्ये गीता प्रेसची स्थापना करण्यात आली होती. गीता प्रेस सर्वाधिक मोठ्या पुस्तक प्रकाशानांपैकी एक आहे. प्रेसने 15 भाषांमध्ये 95 कोटी पुस्तके प्रकाशित केल्याचे लालमणि त्रिपाठी यांनी सांगितले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथील प्रकाशक गीता प्रेसला गेल्या वर्षात गांधी शांती पुरस्काराने (Gandhi Peace Prize) सन्मानित केले होते. गीता प्रेसचे देशभरात स्टोअर्स असल्याचेही त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
अशी डाउनलोड करा रामचरितमानसची मोफत प्रत
आणखी वाचा :
घरबसल्या मिळणार राम मंदिराचा प्रसाद, जाणून घ्या ऑर्डरची प्रक्रिया