नोएडामध्ये आलिशान व्हिला खरेदीला, मिळेल मोफत Lamborghini

रिअल इस्टेट एजंट गौरव गुप्ता यांनी याबाबत ट्विट केल्यानंतर हा विषय चर्चेत आला.

नोएडामधील एका आलिशान हाउसिंग प्रकल्पात व्हिला खरेदी करणाऱ्यांना मोफत Lamborghini कार देण्याची ऑफर दिली जात आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नोएडामधील जेपी ग्रीन्स लक्झरी हाउसिंग प्रकल्प हा आलिशान कार चाहणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर देत आहे.

रिअल इस्टेट एजंट गौरव गुप्ता यांनी याबाबत ट्विट केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. जेपी ग्रीन्सच्या प्रत्येक व्हिलाची किंमत २६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे गुप्ता यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यांची पोस्ट अशी होती: 'नोएडाला एका नवीन व्हिला प्रकल्पात प्रत्येक २६ कोटी रुपयांच्या व्हिलासोबत एक Lamborghini मोफत दिली जात आहे. व्हिला खरेदी करणाऱ्यांना व्हिलासोबत एक Lamborghini मिळेल.'

वृत्तानुसार, २६ कोटी रुपयांच्या व्हिलाच्या किमतीमध्ये कार पार्किंगसारखे इतर शुल्क समाविष्ट नाहीत. त्यामुळे खरेदीदारांना आणखी ३० लाख रुपये खर्च करावे लागतील.

सोशल मीडियावर या पोस्टला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. 'सर्व शेजारी एकाच प्रकारचे व्हिला आणि एकाच प्रकारच्या गाड्या असतील, त्यामुळे कोणाचाही इगो क्लॅश होणार नाही. ही खूप छान कल्पना आहे,' असे एका युजरने लिहिले. तर, 'मूर्ख श्रीमंतांना लक्ष्य करणारी ही एक नवीन व्यवसाय रणनीती आहे,' असे दुसऱ्या युजरने लिहिले. मात्र, जेपी ग्रीन्सने याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

Share this article