IndiGo Airlines : पायलट मारहाण प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट, या मॉडेलने सांगितले सत्य

IndiGo Flight Assault Case : इंडिगो एअरलाइनच्या फ्लाइटमधील पायलट मारहाण प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. पायलटवरील हल्ला चुकीचाच होता, पण विमान उड्डाणास उशीर होण्यामागे प्रवासी जबाबदार असल्याचे पायलटने म्हटले; असा दावा एका महिला प्रवाशाने केला आहे.

Harshada Shirsekar | Published : Jan 16, 2024 8:42 AM IST / Updated: Jan 16 2024, 10:22 PM IST

IndiGo Flight Assault Case : इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमधील पायलट मारहाण प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. विमानामध्ये नेमके काय घडले? याबाबतची माहिती एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.  

या महिला प्रवाशाने दावा करत म्हटलं आहे की, “पायलटवरील हल्ला चुकीचा होता. पण विमान उड्डाणास उशीर होण्यासाठी प्रवासीच जबाबदार आहेत आणि यामध्ये क्रू मेंबर्सची चूक नसल्याचे विधान पायलटने केले”. त्यामुळे आता पायलट मारहाण प्रकरणामध्ये (IndiGo Flight Assault Case) नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 

कोण आहे ही महिला?

विमानातील घटनाक्रम सांगणारी महिला रशियन मॉडेल व अभिनेत्री आहे. इव्हगेनिया बेलस्काया (Evgenia Belskaia) असे तिचे नाव आहे.

इंडिगो फ्लाइटच्या पायलटला का करण्यात आली मारहाण? 

इंडिगो एअरलाइन्सच्या विमान उड्डाणास 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाने पायलटला मारहाण (IndiGo Flight Assault Case) केल्याची घटना घडली. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला. या मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

दरम्यान इव्हगेनिया बेलस्कायाने (Evgenia Belskaia) प्रवाशाचा राग अनावर का झाला? याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणास नवे वळण प्राप्त झाले आहे.

रशियन मॉडेलने नेमके काय म्हटले?

रशियन मॉडेल व अभिनेत्री इव्हगेनिया बेलस्कायाने (Evgenia Belskaia) सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, "दिल्ली-गोवा इंडिगो फ्लाइट (6E-2175) रविवारी (14 जानेवारी 2024) सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी उड्डाण करणार होते. यासाठी सर्व प्रवासी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचले होते. पण विमान उड्डाणास उशीर होणार असल्याची माहिती मिळाली. 

आम्ही सर्वजण विमानतळावर थांबलो. तब्बल 10 तासांनंतर विमानात प्रवेश मिळाला, पण तेथेही दोन ते तीन प्रतीक्षा करावी लागली. यामुळे सर्व प्रवाशांमधील संयमाने अंत गाठला. 

प्रवाशांनी क्रू मेंबर्संना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा पायलटने म्हटले की तुम्ही आणखी प्रश्न विचारले तर उड्डाणास आणखी उशीर होईल. पायलटवर हल्ला करणे चुकीचेच होते, पण अशा परिस्थितीत पायलटनेही शांतपणे उत्तर द्यायला हवे होते. पायलटने प्रवाशांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ही घटना घडली", असा दावा या मॉडेल केला आहे.

आणखी वाचा 

IndiGoचा कॅप्टन घोषणा करत असतानाच प्रवाशाने केली मारहाण, कारण…WATCH VIDEO

Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प

Share this article