लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामागील राजकीय अजेंडा समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल PM नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी करण्याबाबत बोलत असल्याचे ऐकायला मिळाले.
Farmer Protest Delhi : शेतकरी नेते आणि संबंधित संघटनांनी किमान हमी भावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन (Farmer Protest Delhi) पुकारले आहे. लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी हे आंदोलन पुकारण्यात आल्याने यामागे छुपा राजकीय अजेंडा असल्याची चर्चा देखील केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे आंदोलनाविरोधात (Farmer Protest Delhi) होणाऱ्या आरोपास बळ देखील मिळाल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओद्वारे शेतकरी आंदोलनामागील राजकीय अजेंडा उघडकीस आल्याचे बोलले जात आहे. व्हिडीओमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल (Farmer leader Jagjit Singh Dallewal) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात बोलत असल्याचे पाहायला मिळाले.
'मोदींची लोकप्रियता कमी करायचीय'
शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल म्हणाले की, "राम मंदिरामुळे (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. हे नुकसानकारक आहे. त्यांची लोकप्रियता कशी कमी करता येईल? मी लोकांना अनेकदा सांगितले. यासाठी खूप कमी संधी आहेत. वेळ खूप कमी आहे. त्यांचा आलेख (Graph) खूप वाढला आहे. आपल्याकडे खूप कमी दिवसांचा कालावधी आहे. या काही दिवसांमध्ये आपण त्यांचा आलेख खाली आणू शकतो का?"
नवीन समिती स्थापन होणार ?
शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या तिसऱ्या फेरीपूर्वी म्हणजे गुरुवारी (14 फेब्रुवारी) हा व्हिडीओ समोर आला आहे. केंद्र सरकारच्या वतीने अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि नित्यानंद राय हे मंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधताहेत. यादरम्यान एमएसपीवर पीक खरेदीसाठी कायदेशीर हमीसह विविध प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
आणखी वाचा
बिहारचे CM नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, डीजीपींना पाठवली ऑडिओ क्लिप
सुप्रीम कोर्टाकडून Electoral Bonds योजना रद्द, SBIला 3 आठवड्यांत द्यावा लागेल अहवाल