Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचं अखेर राज ठाकरेंना उत्तर | Raj Thackeray

Published : Jul 10, 2026, 07:07 PM IST

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिसिंग लिंक' प्रकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्यावर पुन्हा भाष्य केले. 'भाडेके टट्टू' हा शब्द मागे घेत असल्याचे सांगत त्यांनी त्याऐवजी 'भाटक गदरबा' असा उल्लेख केला. आपण कोणाचाही वैयक्तिक अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्यांवर त्यांनी टीका केली. तसेच विरोधकांवर आणि सभागृहातील वातावरणावर भाष्य करत विनोदी शैलीत काही टिप्पणीही केली.