Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule

Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule

Published : Aug 25, 2026, 01:02 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,086 कोटी जमा केल्याची माहिती दिली. दोन्ही टप्पे मिळून 12 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून आतापर्यंत ₹10,115 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करून कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले ₹50 हजार देण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. अमरावतीतील NICU आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फायर ऑडिट झाले होते का, ते योग्य पद्धतीने झाले होते का आणि आग लागण्यामागे कोण जबाबदार आहे, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर रिक्षाचालकांना मराठीचे तज्ज्ञ होण्याची अपेक्षा नसून दैनंदिन बोलचालीपुरते मराठी शिकण्याचा आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणाचाही परवाना अद्याप रद्द केलेला नसून गरज असल्यास चालकांना आणखी वेळ देण्यास सरकार तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange
04:32Chandrashekhar Bawankule | 18 जिल्ह्यांच्या दुष्काळावर चंद्रशेखर बावनकुळे | Disha Salian Case
08:15Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai
07:07MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE
05:23Eknath Shinde London Visit | लंडन दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं? | Virat Kohli
05:27लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट | Virat Kohli | Eknath Shinde
04:40Marbat Festival | मारबत उत्सवात देवेंद्र फडणवीस, उमेश यादव | Maharashtra Culture