Devendra Fadnavis: लोकशाही संस्था संपवण्याचा डाव | Rahul Gandhi

Published : Oct 06, 2026, 06:01 PM IST

दिल्लीतील आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधत संविधानिक आणि लोकशाही संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून त्यांच्या नावाखाली राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले. MPSC अध्यक्षांना हटवण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या हातात नसल्याचे सांगत चौकशीसाठी सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टपर्यंत पिण्याचे आणि जनावरांचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही त्यांनी दिली.