Eknath Shinde | दुष्काळावर एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही | Maharashtra Drought

Eknath Shinde | दुष्काळावर एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही | Maharashtra Drought

Published : Sep 22, 2026, 07:05 PM IST

मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळसदृश भागात प्राथमिक दुष्काळ एक-दोन दिवसांत जाहीर होईल आणि उद्यापासून ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवकांकडून तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री काही भागांचा दौरा करणार असून, आपण अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त भागात जाणार असल्याचेही शिंदे म्हणाले. पावसाअभावी उभी पिके करपल्याने शेतकरी संकटात असून त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे करून युद्धपातळीवर मदत दिली जाईल आणि केंद्र सरकारकडेही मदत मागितली जाईल. शिवसेनेच्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागांत टँकर, गरजेनुसार चारा छावण्या तसेच पुढील एक-दोन महिन्यांसाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन केले जाईल. शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने ठरली असल्यास अशा कुटुंबांची जबाबदारीही शिवसेना घेईल, असे शिंदे यांनी सांगितले.

08:07Eknath Shinde | दुष्काळावर एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना ग्वाही | Maharashtra Drought
05:45Maharashtra Drought | चंद्रशेखर बावनकुळे: दुष्काळावर आज चर्चा
04:14IIT Bombay विद्यार्थ्याच्या दुर्दैवी अंतावर झीनत साबरीन | Mumbai Youth Congress
04:04IITBombay | साहिलच्या मृत्यूनंतर IIT Bombay विद्यार्थ्याची मागणी | Student Mental Health
04:34संजय राऊत: पंतप्रधानांवर टीका होणारच | Rahul Gandhi | Devendra Fadnavis | Narendra Modi
02:26Pune MNS | मनसेची ही तालिबानी स्टाईल आहे का, शायना एनसी यांचा सवाल
04:00काळाचौकी विजेच्या दुर्घटनेवर वारिस पठाणांची मागणी | Kalachauki electric-shock incident | UCC
02:07Shaina NC | काळाचौकी महागणपती दुर्घटनेवर शायना एनसींच्या सूचना | Kalachauki electric-shock incident
03:05Kolhapur | बॅरिकेड्स जबरदस्ती हटवून पंचगंगेत गणेश विसर्जन | Ganesh Visarjan Ban | Panchganga River