पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027

पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027

Published : Sep 07, 2026, 04:05 PM IST

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवा विधानसभा निवडणुकीबाबत निवडणुका जाहीर झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. एनडीए आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांबाबत बोलताना, निवडणुकीत खोटी कागदपत्रे सादर करून किंवा माहिती लपवून कोणी निवडून आले असेल तर ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रियेनुसार कारवाई होईल, असे शिंदे म्हणाले. पालघरमधील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीला शिवसेना समर्थन देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाबाबत काही गैरप्रकार झाला असेल तर कायदेशीर तक्रारीचा मार्ग स्वीकारायला हवा होता; कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मारहाणप्रकरणी शिवसेना पदाधिकारी राहुल घरत यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित तसेच पक्षातून काढून टाकले जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.