लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये चुरस सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला धक्का देत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता केंद्र सरकारला राज्याच्या थकबाकीसंदर्भात अल्टीमेटम दिला आहे.
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी इंडिया आघाडीला (INDIA Opposition Alliance) धक्का देत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण आता केंद्र सरकारला अल्टीमेट देत ममता बॅनर्जींनी म्हटले आहे की, राज्याचे थकबाकी पैसे दिले नाहीत तर लवकरच आंदोलन सुरू करणार आहे.
ममता बॅनर्जींचा केंद्राला अल्टीमेटम
पश्चिम बंगालच्या शासनाच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकाराला राज्याला 9330 कोटी रूपये द्यायचे आहेत. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत 6900 कोटी रूपये, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे 830 कोटी रूपये, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 770 कोटी रूपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे.
याशिवाय स्वच्छ भारत मिशनचे 350 कोटी रूपये, मध्यान्ह भोजन योजनेचे 175 कोटी रूपये देखील केंद्र सरकारकडून राज्याला देणे शिल्लक आहे. या सर्व गोष्टींसाठी केंद्र सरकारला ममता बॅनर्जींनी एका आठवड्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशाराही ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला दिला आहे. ममता बॅनर्जींनी प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या परेडदरम्यान राजभवनात हे विधान केले होते.
ममता बॅनर्जींनी घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 20 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली होती. या भेटीवेळी राज्याच्या थकबाकीसंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांना या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते.
आणखी वाचा :
Mamta Banerjee Meets With Accident : ममता बॅनर्जींच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत झाल्याची माहिती
Mamta Banerjee Meets With Accident : ममता बॅनर्जींच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत झाल्याची माहिती