Rain Update : पावसाच्या विलंबामुळे खरीप पेरणीवर परिणाम; अन्नधान्याचे भाव, आर्थित स्थितीवर ताण वाढणार? महत्त्वाचा अहवाल समोर

Published : Jun 21, 2026, 06:32 PM IST
Farming

सार

पावासाच्या विलंबाचा परिणाम अनेक गोष्टींवर कमी-अधिक प्रमाणात होतााना दिसतो आहे. पेरण्या, आर्थिक परिस्थिती, अन्नधान्याचे भाव अशा सर्वच बाबींवर याचा परिणाम होण्याचा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे.  

मुंबई : राज्यासह देशभरातील अनेक भागात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. पावसाच्या विलंबामुळे सर्वसामान्यांसह बळीराजाही मोठ्या चिंतेत आहे. या पावसाच्या विलंबाचा मोठा परिणाम अन्नधान्यांच्या किमतीसह आर्थिक परिस्थितीवरही होण्याची शक्यता एका अहवालातून वर्तवण्यात आली आहे.

पावसाच्या विलंबाचा पेरण्यांवर परिणाम

'360 ONE कॅपिटल रिसर्च' या अहवालानुसार, 2026 च्या मान्सूनची भारताच्या नैऋत्य भागात मोसमी पावसाच्या हंगामाची सुरुवात तुलनेने अतिशय कमकुवत झाली आहे. याचा कृषी क्षेत्रावर नकारात्मक परिणाम दिसतो आहे. देशाच्या मोठ्या भागांत पावसाचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. मान्सूनच्या विलंबामुळे कृषी कामांवरही परिणाम झाल्याचं चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीयरित्या घट झाली आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत त्यात 3.9 टक्क्यांची घट झाली आहे.

अन्नधान्याचे भाव, आर्थित स्थितीवर ताण वाढण्याचा अंदाज

'360 वन कॅपिटल रिसर्च'ने दिलेल्या माहितीनुसार, 'पावसाची सध्याची ही परिस्थिती अनेक गोष्टींवर परिणाम करू शकते. पावसाच्या तुटीमुळे अन्नधान्याचे भाव वाढण्याच्या शक्यतेसह ग्रामीण आर्थिक व्यवहारांवर ताण वाढवू शकतो, असा अंदाज आहे. मात्र पावसाच्या पुढच्या काही काळात पाऊस चांगला झाल्यास पिकांची स्थिती सुधारुन आधार मिळू शकतो'

भारतातील 36 पैकी 22 विभागांमध्ये अपुरा पाऊस, तर देशातील जवळपास 66 टक्के भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. या आकडेवारीवरुन यंदाच्या हंगामात किती कमी पाऊस झाला याचे चित्र स्पष्ट होत आहे.

जलाशयांमध्ये पुरेशी पाणीपातळी

अशा परिस्थितीत एक दिलासादायक बाबदेखील अहवालातून स्पष्ट करण्यात आली आहे. पावासाचा या हंगामातील वेग मंदावलेला असला, तरी जलाशयांमध्ये पाण्याची पुरेशी पातळी असून ही सकारात्मक बाब आहे. सिंचनासाठी काही प्रमाणात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हा एक सुरक्षित आधार ठरत आहे. मात्र तरीही मान्सूनच्या आताच्या सुरू असलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, अशी माहिती '360 ONE कॅपिटल रिसर्च' या संस्थेने अधोरेखित करत दिली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department