शिवसेनेच्या वर्धापनदिनीच मोठा धक्का; कोर्टात नेमकं काय घडलं?

Published : Jun 19, 2026, 08:27 PM IST
supreme court

सार

शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, त्यांचे ६ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्याचवेळी, बंडखोर लोकप्रतिनिधींविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने पुरावे नसल्याने फेटाळून लावली आहे, ज्यामुळे लोकशाही धोक्यात असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा फेटाळला गेला.

आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केलं गेलं आहे. शिवसेना ठाकरे गटात आता परत एकदा मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. हा खऱ्या अर्थाने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.

बंडखोर लोकप्रतिनिधींच्या विरोधातील याचिका फेटाळली 

बंडखोर लोकप्रतिनिधींच्या विरोधात याचिका फेटाळण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हि याचिका फेटाळून लावली आहे, याबद्दलच कारण समोर आलं आहे. न्यायालयात नेमकं काय घडलं ते आपण समजून घेणार आहोत. या याचिकेवर सुनावणी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला. सोबतच याचिकाकर्त्यांना प्रश्न विचारला आहे.

याचिकाकर्त्याचं काय म्हणणं होत 

यावेळी याचिकाकर्त्याने त्याच म्हणणं व्यक्त केलं आहे. लोकप्रतिनिधींना पक्ष बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो असं यावेळी याचिकाकर्त्याने म्हटले होते. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळं या बंडखोरीमुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं होत.

सरन्यायाधीश काय म्हणाले? 

यावेळी बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं आहे की, तुम्ही मला एक मिनिट मागितलं होत पण मी तुम्हाला सात मिनिट दिले. हि याचिका फेटाळून लावली जात आहे. या याचिकेची दखल घ्यावी असा एकही पुरावा तुम्ही दिलेला नाही. त्यामुळं हि याचिका फेटाळून लावली जात आहे असं सरन्यायाधीश यांनी म्हटलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department