NEET UG 2026 Re-Exam : नीटच्या फेरपरीक्षेपूर्वी आज देशभरात मॉक ड्रिल, अडीच लाख जवान तैनात

Published : Jun 20, 2026, 11:14 AM IST
NEET (UG) 2026 Re Exam

सार

NEET UG 2026 Re-Exam : येत्या 21 जूनला नीट फेरपरीक्षा होणार आहे. तत्पूर्वी देशभरात परीक्षेआधी मॉक ड्रिल होणार आहे. हे मॉक ड्रिल आज संध्याकाळपर्यंत असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

NEET UG 2026 Re-Exam : 21 जून रोजी देशभरात नीट फेरपरीक्षा पार पडणार आहे. याआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून यासाठी तयारी केली जात आहे. परीक्षेवेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी आज (20 जून) देशभरातील परीक्षा केंद्रावर मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. यासाठी अडीच हजार पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये परीक्षा केंद्रावरील सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गोष्टी केल्या जाणार आहेत.

देशभरात मॉक ड्रिल

परीक्षेच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आज सकाळपासूनच मॉक ड्रिल सुरू करण्यात येणार आहे. या दरम्यान परीक्षा केंद्रे, सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विभागांमधील समन्वयाचीही तपासणी केली जाणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या मॉक ड्रिलमध्ये काही त्रुटी असल्यास त्यावर योग्य उपाययोजना केली जाणार आहे.

तीन स्तरांतील सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा

एनटीएकडे देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी तीन स्तरांतील सुरक्षा व्यवस्था (Three Layer Security) लागू केली जाणार आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेची जबाबदारी निमलष्करी दलांकडे असणार आहे. देशभरातील 5 हजारांहून अधिक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

सोशल मीडियावरही नजर

परीक्षेदरम्यान सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण एनटीएकडे असणार आहे. याशिवाय सोशल मीडियावरील अफवा, पेपरफुटी किंवा संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत असणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

22 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

यंदाच्या नीट फेरपरीक्षेसाठी सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 18 लाख विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात आले आहे. एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, तांत्रिक बिघाड, फिंगरप्रिंटची पडताळणीसाठी अडचण किंवा एखाद्या आरोग्यासंबंधित कारणामुळे बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यास तरीही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार आहे.

 

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department