कॉकरोच जनता पार्टीनं देशभर आंदोलनाची केली घोषणा, उद्या युवक रस्त्यावर उतरणार

Published : Jul 23, 2026, 08:16 PM IST
Cockroach Janata Party

सार

दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात आता २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीने पत्र जारी करून तरुणांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करण्यात येत आहे.

दिल्ली: दिल्लीत जंतर मंतरवरचं आंदोलनातं देशभरातून युवक सहभागी होण्यासाठी आले आहेत. आता उद्या म्हणजेच २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज कारवाईचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी तरुणांनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं अवाहन करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर जारी केलं पत्र 

कॉकरोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर एक पत्र जारी केलं आहे. देशभरात पोलिसांच्या दडपशाही आणि कारवाईला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांना या आंदोलनातून पाठींबा द्या. यावेळी विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांनी परवानगी घेऊन आंदोलन करावे. आंदोलनाच्या ठिकाणी एकत्र आलेल्या नागरिकांसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे वाचन करण्यात यावं.

पत्रात काय म्हटलं? 

यावेळी पत्रात उद्याच आंदोलन कस घेण्यात यावं याबद्दल माहिती देण्यात आली आहे. इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता कि जय अशी घोषणा देत नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी बोलताना म्हटलं की, दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन रद्द; पुन्हा जेलमध्ये जाणार
Parliament Clash : संसदेत राडा! खासदार भिडले, पोस्टर खेचाखेची, नेमकं काय घडलं?