देशात कोणत्याही वेळी लागू होऊ शकतो CAA , लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Published : Feb 28, 2024, 11:31 AM ISTUpdated : Feb 28, 2024, 11:38 AM IST
amit shah11

सार

आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू केला जाऊ शकतो. यासाठी तयारी करण्यात आली असून अचार संहितेआधीच सीएए लागू होण्याची शक्यता आहे.

Citizenship Amendment Act 2019 :  नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत (CAA) मंजूर होऊन किमान पाच वर्षे उलटली असतील. अशातच केंद्र सरकारकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर होण्याआधीच नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू केला जाऊ शकतो. सूत्रांनुसार, सीएए लागू करण्यासंदर्भात तयारी करण्यात आली असून आचार संहितेआधीच या संदर्भातील परिपत्रक जारी केले जाऊ शकते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील आपल्या भाषणांमध्ये सीएए लागू करण्यासंदर्भात अनेक वेळा उल्लेख केला आहे. अमित शाह यांनी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीआधी सीएए लागू केले जाईल. या कायद्याअंतर्गत मुस्लिम समुदायाव्यतिरिक्त तीन मुस्लिम बहुल शेजारील देशांतून येणाऱ्या इतर धर्माच्या नागरिकांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

या देशातील नागरिकांना मिळू शकते नागरिकत्व
वर्ष 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा केली होती. यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील 31 डिसेंबर, 2014 आधी येणाऱ्या सहा अल्पसंख्यांकांना (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारसी) भारताचे नागरिकत्व देण्याची तरदूत आहे. नियमांनुसार, नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत.

नागरिकत्व मिळवण्यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार
केंद्र सरकारने सीएएसंदर्भात एक वेब पोर्टल तयार केले असून जे लवकरच लाँच केले जाणार आहे. तीन मुस्लिम बहुल शेजारील देशांतून येणाऱ्या इतर धर्माच्या नागरिकांना नागरिकत्व मिळवण्यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. याशिवाय सरकारकडून पडताळणी केल्यानंतरच नागरिकत्व प्राप्त होणार आहे. याशिवाय बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या स्थलांतरित अल्पख्यांकांना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नसणार आहे.

वर्ष 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा तयार करण्यात आला
वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्यात सुधारणा करण्यासह देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (NCR) लागू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत ज्या व्यक्ती अवैध रुपात भारतात राहत आहेत त्यांना देशाबाहेर काढण्याची तरतूद केली जाणार होती. केंद्र सरकारने एनसीआरची घोषणा केल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. यामुळे सरकारला सीएए देखील लागू करता आला नाही. पण आता निवडणुकीआधी सीएए लागू करण्यासंदर्भात हालचाली वाढल्या आहेत.

आणखी वाचा : 

Narendra Modi : केरळमध्ये पंतप्रधानांनी दिला 400 पार चा नारा, आता भविष्य कोणापासून लपले नाही

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांना रशियाच्या केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले, राकेश शर्मा यांनी प्रशिक्षण घेतले होते

तुम्ही डोळे बंद करून बसलायत...बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department