CAA बाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल, मोदी सरकार नागरिकत्वाचा हक्क हिरावून घेण्याचा कट रचत असल्याचा केला आरोप

Published : Mar 12, 2024, 05:27 PM IST
mamta banarjee ramnavmi issue

सार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सीएए कायद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 

केंद्र सरकारने सोमवार ११ मार्च रोजी सीएए कायदा लागू करण्याची सूचना जारी केली. त्यानंतर विविध माध्यमांमधून यावर विविध मत मतांतरे व्यक्त करण्यात येत होती. यावर विरोधी पक्षांनी बोलताना निवडणुकीच्या वेळेला मतांचा प्रभाव पडण्याचा मार्ग सत्ताधारी पक्षाने निवडला असल्याचे सांगितलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर सरकारने बंगालचे विभाजन केल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लोकांमध्ये फूट पडावी आणि त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्याचा भाजप सरकारचा कट आहे. जर कोणी अर्ज केला आणि त्याचा अर्ज फेटाळला गेला तर तो बेकायदेशीर स्थलांतरित होईल, असा प्रश्न त्यांनी केला. बंगालमध्ये एक-दोन जागा जिंकण्यासाठी भाजप इथल्या लोकांमध्ये फूट पाडण्यात व्यस्त आहे.

मोदी सरकारवर साधला निशाणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भाजप अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. कालची घोषणा ही "लुडो चाल" आहे. लोकांचे नागरिकत्व हक्क हिरावून घेण्याचे हे षड्यंत्र आहे, असे त्या म्हणाल्या.
आणखी वाचा - 
CAA अधिसूचनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला, IUML ने कायद्यावर बंदी घालण्याची याचिकेद्वारे केली मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 41 दिवसांत 24 राज्यांचा गेला जलद दौरा, बंगालातही पोहोचले पंतप्रधान
Loksabha Election 2024 : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नाही लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!