Road Accident : छत्तीसगढ येथे भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी

Road Accident : छत्तीगढ येथे भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातावेळी नक्की काय घडले जाणून घेऊया सविस्तर वृत्त...

Chanda Mandavkar | Published : Apr 29, 2024 2:42 AM IST

Chhattisgarh road accident  : छत्तीगड (Chhattisgarh) येथील बेमेतरा येथे भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यापैकी चार जणांची प्रकृती नाजूक आहे. जखमी झालेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कसा घडला अपघात? 
पथर्रा गावातून तिरैया जन्मत्सोसवासाठी गावकरी गेले होते. रात्री 12 वाजता तिरैया येथून घरी गावकरी परतत असताना अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गाच्या किनाऱ्याला उभ्या असलेल्या कारला गावकऱ्यांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. यामध्ये जागीच काहीजणांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना बेमेतरा जिल्हा रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घनटेतील मृतांमध्ये पाच महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बेमेतराचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा आणि पोलीस अधिक्षक रामकृष्ण साहू जिल्हा रुग्णालयात पोहोचले. याशिवाय स्थानिक आमदार दीपेश साहू यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी नागरिकांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.

उत्तर प्रदेशातील अपघातात 6 जणांचा मृत्यू
रविवारी (29 एप्रिल) उत्तर प्रदेसातील उन्नाव येथे मोठा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक जोरदार धडक दिली. बसमध्ये असलेल्या 28 जणांपैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. याशिवाय अन्यकाही जण गंभीर जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आणखी वाचा : 

Earthquake : चीननंतर आता म्यानमारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

12 वी परीक्षेचा निकाल लागताच ,या राज्यात 48 तासात 7 विद्यार्थ्यांची आत्महत्या

Share this article