सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तीन हजार अपरेंटिस पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. येत्या 6 मार्चपर्यंत तुम्हाला या नोकर भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया तीन अप्रेंटिस पदांवर नोकर भरती करणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 22 फेब्रुवारी पासून सुरू झाली असून येत्या 6 मार्च पर्यंत योग्य उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.nats.education.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी 31 मार्च, 2020 नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी शुल्क
पीडब्लूबीडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 400 रुपये, SC/ST/सर्व महिला उमेदवार/EWS साठी अर्जासाठी 600 रुपये भरावे लागणार आहेत. अन्य सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क 800 रुपये भरावा लागणार आहे.
आणखी वाचा :