Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही, वाचा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेबद्दल सविस्तर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबबद्दलची घोषणा केली आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 1, 2024 7:11 AM IST / Updated: Feb 01 2024, 12:45 PM IST

Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पाचा वाचनाला सुरुवात केल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, देशाची जनता भविष्याच्या दिशेने पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत. पंतप्रधानांनी वर्ष 2014 मध्ये काम सुरू केले होते, त्यावेळी खूप आव्हानांचा सामना करावा लागला होता. जनेतेच्या हितासाठी काम सुरू करण्यात आले होते. जनतेला अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. देशातील जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकार म्हणून निवडले आहे.

निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान आवास योजना, मोफत वीज सेवा, आंगणवाडी, रेल्वे कॉरिडोरसह टॅक्स स्लॅबबद्दल घोषणा केली आहे.

10 वर्षात तिप्पट टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ- निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 44.90 कोटी रूपये खर्च करण्यात आले असून 30 लाख कोटी रूपयांचा महसूल येणाच्या अंदाज आहे. याशिवाय 10 वर्षात इनकम टॅक्स कलेक्शन तिप्पट वाढले आहे. टॅक्सच्या रेटमध्ये कपातही करण्यात आली. अशातच आता टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या करदात्यांना दिलासा देण्यास आलेला नाही. पण सात लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स भरावा लागत नाही. इनकम टॅक्स भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. रिफंड देखील लवकरच जारी केला जाणार आहे. जीएसटी कलेक्शनही दुप्पटीने वाढले आहे.

अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याआधी राष्ट्रपतींनी निर्मला सीतारमण यांचे तोंड गोड केले
अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. राष्ट्रपती भवनात राष्ट्पती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निर्मला सीतारमण यांचे तोंड गोड केले. यावेळी अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी, भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

आणखी वाचा : 

अंतरिम अर्थसंकल्पाआधी आनंदाची बातमी ! नऊ महिन्यात क्रेडिट फ्लो 1.6 पटीने वाढला, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात किती झाली वाढ

Interim Budget 2024 LIVE : टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत - निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या

Read more Articles on
Share this article