
आपण गरीब आहात आणि आपल्या खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये आल्यावर आपल्याला काय वाटेल. अशीच एक घटना घडली असून एका २० वर्षीय तरुणाच्या अकाउंटवर कोट्यवधी रुपये आले होते. नोएडा येथे राहणाऱ्या या तरुणाच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आले असून तो एका रात्रीत कोट्याधीश झाला आहे.
हा मुलगा मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पैशांचा मालक झाला आहे. सामान्य माणसाला रक्कम मोजता येणार नाही, एवढी रक्कम त्या मुलाच्या खात्यात आली होती. या मुलाचे नाव दीपक असून त्याच्या खात्यामध्ये तब्बल ३६ अंकी रक्कम जमा झाली होती. ही रक्कम तब्बल १०,०१,३५,६०,००,००,००,००,००,०१,००,२३,५६,००,००,००,००,२९९ इतकी आहे. जर ही रक्कम मोजायची झाली, तर दोनशे नव्वद नॉनिल, तीनशे छप्पन्न ऑक्टिल, वीस ट्रिलियन, एक कोटी, एक लाख, तीनशे पंचेचाळीस सेप्टिलियन लाख कोटी रुपये इतकी होते.
मात्र हे पैसे कुठून आले याचा अजूनही तपास लागलेला नाही. आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून दिपकचे बँक खाते बँकेच्या वतीने गोठवण्यात आलं आहे. हा प्रकार तांत्रिक गोष्टींमुळे झालेला असू शकतो किंवा सायबर हल्ल्याची माहिती काढून पाहिली जात आहे. हे बँक खाते दिपकच्या मृत आईचे असून आईनंतर तोच हे खाते वापरत आहे.
त्याच्या अकाउंटवर ३७ अंकी रक्कम जमा झाल्याचा मेसेज त्याला मिळाला. त्यानंतर तो बँकेत गेला. त्यावेळी बँकेचे अधिकारी सुद्धा इतकी प्रचंड रक्कम पाहून चक्रावून गेले. एका सामान्य व्यक्तीच्या खात्यावर इतके पैसे येतील कसे? हा गुंता अद्याप सुटलेला नाही. एका सामान्य व्यक्तीच्या अकाऊण्टवर एवढी मोठी रक्कम आल्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल.