
महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असून महाराष्ट्रातील सर्व 17 जागांवर महायुतीच विजयी होईल, असा दावा महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसची जिंकण्याची शक्यता नाही, त्या ठिकाणी निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.