Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईमध्ये अंबानी-अदानींनाही सोडले मागे
Savitri Jindal : कोण आहेत सावित्री जिंदल? त्यांच्याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती…
Harshada Shirsekar | Published : Dec 20, 2023 8:16 AM IST / Updated: Dec 20 2023, 06:36 PM IST
कोण आहेत सावित्री जिंदल?
सावित्री जिंदल या ओ.पी.जिंदल ग्रुपच्या चेअरपर्सन आहेत. या कंपनीची स्थापना त्यांचे पती ओम प्रकाश जिंदल यांनी केली होती. स्टील इंडस्ट्रीव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांमध्येही त्यांचे कित्येक व्यवसाय आहेत.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?
देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांच्या एकूण संपत्तीमध्ये वर्ष 2023 मध्ये इतकी वाढ झाली की त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही मागे सोडले आहे.
वर्ष 2023मध्ये सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत किती वाढ झाली?
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या माहितीनुसार, सावित्री जिंदल यांची कमाई वर्षभरात जवळपास 9.6 बिलियन डॉलर इतकी वाढली आहे. आता त्यांचे एकूण नेटवर्थ 25 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.
सावित्री जिंदल यांनी कसा सांभळला व्यवसाय?
पतीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर सावित्री यांनी ओ.पी. जिंदल ग्रुपचा कार्यभार स्वीकारला आणि कंपनीला मोठे यश देखील मिळवून दिले. त्यांच्या व्यवसायात जलदगतीने वाढ होताना दिसत आहे.
अंबानी-अदानींची संपत्तीत किती वाढ झाली?
वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीत पाच बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. तर अदानी ग्रुपचे चेअरपर्सन गौतम अदानी यांची संपत्ती 35.4 बिलियन डॉलर्सने कमी झाली.
या अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली वाढ
सावित्री जिंदल यांच्यानंतर HCL टेक्नोलॉजीचे संस्थापक व चेअरमन शिव नादर यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या एकूण संपत्तीत वर्षभरात आठ बिलियन डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. तर DLF कंपनीचे के.पी.सिंह यांची संपत्ती सात बिलियन डॉलरने वाढली आहे.