अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सोहळ्यासाठी पाहुणे मंदिरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून साधू-संत देखील अयोध्येत आले आहेत. राम मंदिर परिसर आज राममय झाला आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. देशभरातून साधू-संत, उद्योगपती, प्रतिष्ठित व्यक्ती मंदिरात येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राम मंदिराचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये मंदिराच्या परिसरातील मनमोहक दृश्य पाहून तुम्हीही प्रभू श्रीरामांच्या भक्तीरसात तल्लीन व्हाल हे नक्की.
राम मंदिराला फुलांची सजावट
अयोध्येतील राम मंदिराला वेगवेगळ्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. याशिवाय गाभाऱ्यात विशेष सुवासिक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिरात पोहोचणाऱ्या प्रत्येकाच्या मुखातून जय श्री रामचा जयघोष केला जात आहे. संपूर्ण राम मंदिर परिसर ‘राममय’ झाल्याचे दिसून येत आहे.
राम मंदिरात साधू-संतांचे आगमन
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी साधू-संतांचे आगमन होत आहे. प्रभू श्रीरामांच्या नाव घेत मंदिरात प्रवेश केला जात आहे. या भव्यदिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. याशिवाय काहीजण आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात मंदिर परिसारातील दृश्ये टिपत आहेत.
रामललांची प्राणप्रतिष्ठा
आज रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येत आज रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्या मोठ्या उत्साहात-आनंदात पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह यांच्यासह देश-विदेशातून सात हजार व्हीव्हीआयपी (VVIP) अयोध्येत येणार आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतातील मंदिरांनाही सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा :
ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा
रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अंगणात काढा या सुंदर रांगोळ्या