Ayodhya Deepotsav : छोटी दिवाळीच्या रात्री अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली. यावेळी शरयू नदीच्या काठावर लेझर शोसह ५६ घाटांवर २६ लाखांहून अधिक मातीचे दिवे लावण्यात आले. या दिव्यांच्या रोषणाईने रामनगरीचे नाव गिनीज रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.
अयोध्येत रविवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भव्य दीपोत्सव सोहळ्यात शरयू नदीच्या काठावर २६ लाखांहून अधिक मातीचे दिवे उजळले.
210
दीपोत्सवात झाले २ वर्ल्ड रेकॉर्ड
अयोध्येतील दीपोत्सव २०२५ दरम्यान दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाले. पहिला म्हणजे एकाच ठिकाणी २६ लाखांहून अधिक दिवे लावणे आणि दुसरा म्हणजे २१२८ लोकांनी एकत्र आरती करणे.
310
दिवाळीपूर्वी रोषणाईने उजळले भव्य राम मंदिर
दिवाळीच्या आधी अयोध्या येथील राम मंदिरावर विशेष रोषणाई करण्यात आली. यावेळी मंदिर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाले. हे दृश्य सर्वांचे मन मोहून घेते.
दीपोत्सवादरम्यान अयोध्येच्या आकाशात लेझर शोद्वारे प्रभू श्रीरामांच्या लीलाही दाखवण्यात आल्या.
510
ड्रोनने टिपलेले शरयू घाटावरील दीपोत्सवाचे दृश्य
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने ड्रोनच्या मदतीने जळणाऱ्या दिव्यांची मोजणी केली आणि त्यानंतर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाल्याची पुष्टी केली.
610
शोभायात्रेत प्रभू रामाशी संबंधित २२ देखावे
यापूर्वी रविवारी दीपोत्सव आणि छोटी दिवाळीनिमित्त अयोध्येत एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये २२ देखावे दाखवण्यात आले.
710
शोभायात्रेत रामायणातील ७ कांडांचे दर्शन
या शोभायात्रेत रामायणातील सात कांड - बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड यातून भगवान रामाचा प्रवास दाखवण्यात आला.
810
योगींनी केली शरयू घाटावर आरती
दीपोत्सवापूर्वी शरयू घाटावर आरती करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.
910
शरयू मातेच्या आरतीवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ म्हणाले- दिव्य आणि भव्य 'दीपोत्सव-२०२५' च्या पवित्र प्रसंगी आज धर्मनगरी श्री अयोध्या धाममध्ये शरयू मातेची आरती करण्याचे सौभाग्य लाभले.
1010
योगी आदित्यनाथ यांनी केली सुख-समृद्धीची कामना
योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या X हँडलवर शरयू आरतीचे फोटो शेअर करत लिहिले - 'शरयू माता सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि कल्याणाचा मार्ग प्रशस्त करो - हीच माझी प्रार्थना आहे. जय माँ सरयू!'