आई वडिलांकडे लक्ष न दिल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा कापणार पगार, या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांच्या पायाखालची सरकली जमीन

Published : Oct 20, 2025, 10:22 AM IST

तेलंगणा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन कायदा आणण्याची घोषणा केली आहे. यानुसार, जे कर्मचारी आपल्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्या पगारातून १५ टक्क्यांपर्यंत कपात करून ती रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा केली जाईल. 

PREV
16
आई वडिलांकडे लक्ष न दिल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा कापणार पगार, या निर्णयामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पायाखालची सरकली जमीन

देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत एक महत्वपूर्ण घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एका नवीन आदेश दिला असून त्यामुळं सरकारी अधिकारी घाबरून गेले आहेत.

26
सरकार कोणता कायदा करणार?

सरकारच्या वतीने नवीन कायदा करण्यात येणार असून वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा लक्ष न देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

36
सरकार कोणती कारवाई करणार?

एखादा सरकारी कर्मचारी जर त्याच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याच्या मासिक पगारातील विशिष्ट भाग कापून तो थेट दुर्लक्ष होणाऱ्या पालकांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

46
अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देताना केली घोषणा

अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. दुर्लक्ष केल्यानंतर पालकांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी हा नवीन कायदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

56
सरकार कधी हस्तक्षेप करील?

योजनेनुसार सरकारी कर्मचारी जर पालकांची काळजी घेत नसेल तर सरकार हस्तक्षेप करेल आणि त्यांच्या पगारात १५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाईल. हि जमा केलेली रक्कम पालकांच्या बँक खात्यात जमा होईल.

66
पालकांना देईल आर्थिक आधार

त्यामुळं पालकांना आर्थिक आधार मिळू शकतो. अशा पालकांसाठी हा निर्णय महत्वपूर्ण राहणार असून ज्यांना त्यांच्या पाल्यांवर पैशांसाठी अवलंबून राहावे लागते.

Read more Photos on

Recommended Stories